दीपक खिलारे
इंदापूर : महाराष्ट्र केसरी निवड चाचणी ६५ वे अधिवेशन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने इंदापूर तालुका तालीम निवड चाचणी स्पर्धा २०२२ मोठ्या उत्साहात (दि.२३) रोजी इंदापूर मध्ये संपन्न झाल्या. यावेळी विविध वजन गटातून माती व गादी अशा दोन्ही विभागतून २० मल्ल पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धेसाठी निवडण्यात आले. या स्पर्धेत एकूण ३५० कुस्तीगिरांनी सहभाग नोंदवला.
पै. विजय शिद व इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे यांच्या प्रयत्नातून इंदापूर नगरपरिषदेसमोरील मैदानात या तालुकास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या ठिकाणी दोन्ही बाजूला प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरी उभारण्यात आली होती. एका बाजूला मॅट तर दुसऱ्या बाजूला मातीतील आखाडा तयार करण्यात आला होता. या स्पर्धेला इंदापूर तालुक्यातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
या स्पर्धेस उपविभागीय पोलीस अधिकारी पै.राहुल आवारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा, पुणे जिल्हा परिषदचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, पै.प्रदीप जगदाळे, गटनेते कैलास कदम, ५१ गदेचे मानकरी पै.अस्लम काझी, अतुल पाटील, रावसाहेब मगर आदी उपस्थित होते.
तर स्पर्धेचे पंच म्हणून मोहन खोपडे, शरद झोळ, पप्पू कालेकर, निलेश मारणे, अनिल तरंगे, अशोक करे, सागर नरळे, सागर मारकड, अशोक बंडगर यांनी काम पाहिले.
इंदापूर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पै. मारुती मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चोरमले, सचिव शरद झोळ, खजिनदार दत्तात्रय जाधव, पै.कमाल जमादार, सचिन बनकर, सचिन चांदणे, परशुराम करगळ, भारत जाधव, पै.नवनाथ तरंगे, पै.पांडुरंग राऊत, पै.सोनबा गिरी, पै.अस्लम मुलाणी, पै.अशोक चोरमले, पै.शशिकांत सोनार, हनुमंत पवार आदींनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.