संतोष पवार
इंदापूर : सहकारी संस्थाच्या बळकटीकरणासाठी शासन प्रयत्नशील असून त्याकरिता शासनस्तरावर विकास संस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले. पळसदेव (ता .इंदापूर ) येथील विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या जेनेरिक मेडिकल दुकानाचा प्रारंभ आणि श्री पळसनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तावरे म्हणाले की देशाच्या आणि राज्याच्या विकास प्रकियेत सहकार चळवळीचे योगदान महत्वाचे असून सहकारी संस्थाकडून शेतकरी हितास प्राधान्य दिले जात आहे. संगणकीकरणामुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रिया सुलभ होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे सोपे होणार आहे . पळसदेव येथे सुरू झालेल्या जेनेरिक मेडिकल स्टोअरमधुन रुग्णांनी कमी किंमतीत दर्जेदार औषधांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले . याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप म्हणाले की विकास संस्थेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात दोन जेनेरिक मेडिकलची उभारणी झाली असून इंदापूर तालुका विकास संस्थेच्या कामकाजात अग्रेसर आहे.
दरम्यान पळसदेव गावचे सुपुत्र आणि मुंबईचे जिल्हा उपनिबंधक नितीन काळे यांनी पुर्नवसित पळसदेव गावच्या आठवणींना उजाळा दिला . संस्थेचे कामकाज उत्कृष्ठपणे केल्याबद्दल संस्थेचे सचिव बाळासाहेब बांडे यांचा सत्कार सहकार आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सहकार आयुक्त दीपक तावरे , विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, मुंबईचे जिल्हा उपनिबंधक नितीन काळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, जिल्हा विशेष लेखापरिक्षक दादाभाऊ काळे सहायक निबंधक एस एस कदम, जिल्हा बँकेचे उपविभागीय अधिकारी आनंद थोरात, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद काळे, कर्मयोगीचे संचालक भूषण काळे, हिराचंद काळे हरिश काळेल मेघराज कुचेकर अनिल काळे प्रविण काळे, सुरेखा काळे, संतोष काळे, बाळासाहेब होरणे, मिलींद फासे, बाळासाहेब बांडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी काळे यांनी तर आभार खंडु काळे यांनी मानले.