पुणे : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका तरुणाला जुन्या भांडणाच्या वादातून अपहरण केले आणि त्याला निर्जन स्थळी नेत जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच त्याच्याजवळील खिशातील पैसे व सोन्याची चैन काढून घेत पोलीसांत तक्रार केली तर जीवे मारुन टाकेन, अशी धमकी दिली. ही घटना शनिवारी (ता.0.5) रोजी घडली आहे.
याप्रकरणाबाबत विराज ढमढेरे (वय-21, रा. दुर्गा आळी तळेगाव ढमेढेरे ता. शिरुर) याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी 32 जणांवर गुन्हा दाखल करत 18 जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.05) रात्री तळेगाव- ढमढेरे येथील तरुण विराज ढमढेरे हा येथील पुणे-नगर महामार्गावरील येवले चहाजवळ आपल्या काही मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी तीन वर्षापूर्वीच्या झालेल्या वादातून तसेच या आठवड्यात गाडीला कट मारल्याच्या रागातून 32 जणांनी अचानक त्या जागी पोहोचले आणि त्यांनी विराजला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याला निर्जळ स्थळी नेऊन एका तरुणाने मोबाईलमध्ये आम्हाला भाई बोल, सॉरी बोल असे म्हणत शुटींग करुन घेतले. त्यानंतर जुन्या वादाच्या भांडणातून शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली.
विराज हा शिक्रापूरमध्ये येऊन घडलेला सर्व प्रकार वडील योगेश ढमढेरे यांना सांगितला. विराजने दिलेल्या फिर्यादीवरुन शिक्रापूर पोलीसांनी जॉन्टी उर्फ तेजस सगळगिले, अनिकेत गुलाबराव रसाळ, रोहन शेलार, प्रशांत अनिल रसाळ, सिद्धेश रसाळ, शंतनु रोहिदास नरके, ओम राजेंद्र नरके, शुभम विनोद राठोड, निखिल बंटीराव पवार, मनोज सुरेश नवले, शेखर हिरामण भुजबळ, चारुदत्त रोहिदास नरके, लक्ष्मण आळेदास जाधव, सूरज मारुती भुजबळ, प्रसाद पंडित (सर्वजण रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर) तसेच कुणाल सुनील हरगुडे, सागर श्रीहरी दरेकर, अजय बापूसाहेब शिंदे, तुषार ज्ञानेश्वर लांडगे, स्वप्नील लक्ष्मण दरेकर, सौरव अजित दरेकर, अमोल नंदकुमार चावटे (सर्व रा. सणसवाडी), तसेच संग्राम दशरथ खैरे, गौरव सुखदेव शिंदे, तुषार सुधीर भारती, मयूर किरण आढाव (सर्व रा. शिक्रापूर) यांच्यासह पाच ते सहाजणांवर अपहरण, मारहाण आणि लूट असे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 18 जणांना अटक करण्यात आली