उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत हवेली तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन (ता. हवेली) येथे गुरुवारी (ता. २४) रोजी उत्साहात संपन्न झाल्या.
यशवंतराव चव्हाण कला, क्रिडा, व सांस्कृतिक महोत्सव तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात करण्यात आले होते.
या स्पर्धेत हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर, वाघोली, लोणीकंद, देहू, खेड शिवापूर या सहा बीटमधील सुमारे २१ केंद्रातील २२६ शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवांतर्गत हवेली तालुकास्तरीय स्पर्धेट लहान गट व मोठा गटाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धावणे, गोळा फेक, थाळीफेक, उंचउडी, लांबउडी, वकृत्व स्पर्धा, खो खो, कबड्डी, भजन स्पर्धा, लोकनृत्य आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि पदक देण्यात आले तसेच सांघिक स्पर्धेसाठी प्रशस्तीपत्रक आणि चषक देण्यात आला.
स्पर्धेसाठी शालेय व्यवस्थापन समिती, महात्मा गांधी, परिसरातील शिक्षक पंच, उरुळी कांचन परिसरातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य व हवेली तालुक्यातील सहा बीटमधील सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेच्या निकाल प्रसंगी विद्यार्थ्यांना चषक, पदक व प्रमाणपत्र देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जेवणाची उत्कृष्ट सोय महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली होती.
दरम्यान, कार्यक्रमाचे उद्घाटन क्रीडाज्योत पेटवून पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन मान्यवरांनी केले. माजी सरपंच संतोष कांचन यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, उपसरपंच अनिता भाऊसाहेब तुपे, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, भाऊसाहेब कांचन, सुभाष बगाडे उपस्थित होते.
तसेच महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले, शिक्षणविस्तार अधिकारी शब्बीर शेख, शिंदवणे केंद्राचे केंद्रप्रमुख चिंतामण अद्वैत, पांडुरंग ताटे, शिवाजीराव गायकवाड, अंकुश बडे, सुधीर चटणे, महेंद्र कुमार मोरे, उल्हास रावळ, उरुळी कांचन येथील उर्दू शाळेचे कुरेशी सर यांनी विशेष सहकार्य केले. सह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच गुणवंत गायकवाड, संदीप गायकवाड, उज्वला नांदखेले, मसू वाघमारे, संभाजी कुंजीर, नामदेव कुंजीर, ह .चि. कुंजीर सर, सारिका ताटे, रेश्मा शेख यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
महात्मा गांधी विद्यालयाचे शेखर शिंदे, सचिन जगताप, मेघना खाडीलकर, अभिमन्यू सुतार यांनी स्पर्धेमध्ये अत्यंत मोलाची भूमिका पार पाडली. सूत्रसंचालन विजय पिठे यांनी केले.
स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे स्पर्धा प्रकार, गट, प्रथम क्रमांक मुलाचे नाव कंसात शाळेचे नाव :-
धावणे – लहान गट १ ते ५ मुले – प्रथम क्रमांक – स्वप्नील संतोष इंगुळकर (आर्वी), धावणे मुली – रेखा नावराज थापा (शिवणे), धावणे मोठा गट ६ ते ८ – मुले – प्रथम- गोपाल मानसिंग थापा (फुरसुंगी) मुली – सायली दत्तात्रय सावंत (सोरतापवाडी),
उंच उडी – लहान गट -१ते ५ – प्रथम क्रमांक – विक्रम देवेंद्र रॉय (फुरसुंगी), मुली भक्ती सुनील परदेसी – (मांजरी खुर्द) उंच उडी मोठा गट – ६ ते ८ प्रथम – अर्जुन करणसिंग जनाला (उंड्री), मुली – प्रथम – प्रगती सचिन खले (मांजरी खुर्द)
लांब उडी मुले – लहान गट – प्रथम विक्रम रतन दमाई, (शिवणे) मुली – भक्ती सुनील परदेसी (मांजरी खुर्द), लांब उडी मोठा गट – ६ ते ८ प्रथम यश राजू डोलारे (मांजरी खुर्द) मुली – दिपाली शेषराव गायकवाड (बकोरी)
गोळा फेक मोठा गट प्रथम – फरहान अफजल अन्सारी, उर्दू शाळा, (उरुळी कांचन) मुली – प्रथम – अफरीन रहिमान शेख, (लोहगाव), थाळी फेक मुले मोठा गट – प्रथम – शिवश्री धनाजी जाधव (केसनंद) मुली – अफरीन रहिमान शेख, (लोहगाव),
वकृत्व स्पर्धा लहान गट – १ ते ५ नंदिनी गंगाधर शेळके, (केसनंद), मोठा गट – प्रणाली दादा कांबळे (बकोरी)