पुणे : पुरंदर तालुक्यातील माजी सरपंचाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी आरोपी सरपंचाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
संतोष नाझिरकर (वय-४० रा. पुरंदर तालुका) असे नराधम सरपंचाचे नाव असून पुरंदरसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नाझिरकर व पीडित अल्पवयीन तरुणी यांची व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती. चॅटिंग करत दोघांमध्ये चांगलीच ओळख झाली. नाझिरकर याने बुधवारी (ता. २३) बाहेर जेवायला जाऊ असं सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज इथे असलेल्या एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, पीडित मुलीने घटना घडण्यापूर्वी बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लोकेशन पाठवले. आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी संतोष नाझीरकर याला बलात्कार करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.