पुणे : नुकतेच ता.4 रोजी मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी यांनी गाडी क्र. ०१५२२ दौंड-हडपसर डेमू ही पुणे स्टेशन पर्यंत विस्तार करण्यासाठी मंजुरी दिली आहे. ही गाडी पाच मिनिटांनी अगोदर (दौंड वरून सकाळी ६.०५ मिनिटांनी) केली असुन आता पुणे स्टेशन पर्यंत धावणार आहे.
गेल्या दीड वर्षापासून रेल्वे प्रशासनाने ही गाडी हडपसर येथे विनाकारण शॉर्ट-टर्मिनेट केली होती परंतु आज ही गाडी पुणे स्टेशन पर्यंत चालवण्यात आली आहे. तरीही पुणे-दौंड रेल्वे प्रवाशांच्या प्रमुख मागणी ला यश आलेले दिसत नाहीं. प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की राज्य शासन मार्फत दौंड शहराला उपनगरीय दर्जा देऊन पुणे ते दौंड दरम्यान उपनगरीय लोकल सेवा सुरू करावी. सध्या पाहता लोणावळ्याला उपनगरीय दर्जा असुन पुणे ते लोणावळा दरम्यान एकदम सुखकर रेल्वे प्रवास होतो, परंतु पुणे ते दौंड दरम्यान रेल्वे प्रवासाचे बारा वाजले असुन कमी लोकल फेऱ्यामुळे नागरिक उपनगरीय लोकल सेवेसाठी मागणी करत आहे.
दौंड शहराला उपनगरीय दर्जा नसल्या आभवी अनेक वर्षांपासून पुणे ते दौंड दरम्यान उपनगरीय लोकल सेवा सुरू होऊ शकली नाही. पुणे ते दौंड दरम्यान प्रवास करण्यासाठी दोन्ही बाजूने फक्त सहा डेमूच्या फेऱ्या आहे. परंतू पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय लोकल सेवेच्या चाळीस फेऱ्या असुन लोणावळा प्रमाणेच पुणे ते दौंड दरम्यान उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यात यावी. अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे.