सासवड : खानापूर जवळच्या घेरा सिंहगड गावच्या हद्दीत शनिवारी (दि. १४) मध्यरात्री झालेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला. सोमनाथ आनंता वाघ (वय. 24 वर्ष, रा. म्हस्कोबा मंदीराजवळ, खानापुर, ता. हवेली, जि. पुणे) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पाच आरोपीना अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार झाला होता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चेतन उर्फ दादया चंद्रकांत जावळकर, यश उर्फ माम्या चंद्रकांत जावळकर, प्रवीण दशरथ सांबरे, विकास उर्फ पांडा विलास नारगे, साहिल उर्फ चाॅकलेट बाळु कोडके, मयत-राहित उर्फ भोऱ्या धर्मेंद्र ढिले (सर्व रा. खानापुर, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर श्रीनाथ अशोक बडदे (वय-२४, रा. कोडीत बु, ता. पुरंदर, जि. पुणे) असं फरार झालेल्या आरोपीचे नाव असून त्याला सासवड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋशिकेष अधिकारी, पोलीस हवालदार रूपेश भगत, जब्बार सय्यद, गणेश पोटे हे चांबळी, गराडे, कोडीत भागात पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी श्रीनाथ अशोक बडदे हा चांबळी येथे मिळुन आला असुन त्याला ताब्यात घेतले आहे. सादर आरोपीस पुढील कारवाईकामी हवेली पोलीस ठाणे पथकाचे ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास हवेली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हे करीत आहेत.