पुणे: पुण्यासह कोकण विभागासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या-एसडीआरएफच्या दोन कंपन्या स्थापन करण्यास आज (दि.४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
पुण्यात दौंड आणि कोकणात नवी मुंबई येथे या कंपन्या असतील. प्रत्येक कंपनीत एकूण चार टीम असतील. त्यापैकी तीन टिम्स प्रत्यक्षात आपत्ती प्रतिसादात काम करतील. या दोन्ही कंपन्यांसाठी ४२८ पदे पोलीस महासंचालकांमार्फत निर्माण केली जातील. यासाठी ३७ कोटी रुपये खर्च येईल.