बापू मुळीक
पुरंदर : सोनोरी येथे बैलपोळ्याच्या सणादिवशी मिरवणुकीमध्ये सावकार वस्ती ओढ्या जवळ चिंचेच्या झाडाची फांदी साऊंड सिस्टिमसह गाडी सोबत चालत असलेल्या मदतनीस प्रवीण उर्फ रवींद्र चंद्रकांत रणधीर(रा. वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे) याच्या डोक्यावर पडून त्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे.
सासवड पोलीस स्टेशनची कोणतीही परवानगी न घेतल्याने आरोपी बैल मालक सौरभ पंढरीनाथ काळे ,बाळासो नाना काळे (दोन्हीही राहणार सोनोरी), डीजे सिस्टीम मालक अभिजीत बुवा दिवेकर, लखन युवराज घोडके (दोन्हीही राहणार वरवंड, ता. दौंड) यांच्यावर आदेश लागू केला असताना त्यांनी आदेशाचे उल्लंघन करणे, डीजे सिस्टीम वाजवण्याची कायदेशीर परवानगी न घेणे, तसेच सोबत मदतनीसाच्या सुरक्षितेची कोणतीही काळजी न घेणे, मदतनीस प्रवीणच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे इत्यांदीबाबत सासवड पोलीस स्टेशनकडून कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस हवालदार जब्बार हरून सय्यद यांनी या संदर्भात सासवड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. पोलीस हवालदार शेगर यांनी यासंदर्भातील गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक चोरगे ए. एस करीत आहेत.