उत्तर प्रदेश : गेल्या काही दिवसांपासून कामाच्या अति ताणतणावामुळे अनेक जण आयुष्य संपवत असल्याचे बातम्या ऐकायला मिळत आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील झाशी येथील बजाज फायनान्समध्ये एरिया मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तरुण सक्सेना असं मृत कर्मचा-याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण हे बजाज फायनान्समध्ये काम करत होते. येथे त्यांना कर्जाचे ईएमआय गोळा करण्याचे काम देण्यात आले होते. त्यांनी पत्नीसाठी चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्यांनी कामात होणा-या त्रासाचा उल्लेख केला आहे. सोमवारी सकाळी ते त्यांच्या राहत्या घरी मृतअवस्थेत आढळले.
काय लिहिले आहे चिठ्ठीत…?
“मी गेले 45 दिवस झोपलेलो नाही. कसंबसं जेवण करत आहे. माझ्यावर कामाचे खूप तणाव आहे. सीनियर मॅनेजर कोणत्याही पद्धतीनं टार्गेट पूर्ण कर किंवा नोकरी सोड असा दबाव माझ्यावर टाकत आहेत, तरुण सक्सेना यांनी या चिठ्ठीमध्ये त्यांच्या आई-वडिलांना एक विनंती केली आहे. ‘मी मुलांच्या शाळेची फी या वर्षाअखेरपर्यंत भरली आहे. मी सर्व सदस्यांनी माफी मागतो. तुम्ही सर्वांनी मेघा, यथार्ड आणि पीहूची काळजी घ्या. मम्मी, पप्पा मी तुमच्याकडं कधी काही मागितलं नाही. पण आज मागतो. मुलांना देखील खूप शिकवा आणि तसेच आपल्या आईला सांभाला असेही तरुण यांनी चिठ्ठीत विनंती केली आहे.