पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता कात्रज परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला आल्याचे पाहून स्वत: च्या अंगावरील कपडे काढून नग्न होऊन अश्लिल वर्तन करुन महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना एम के फिटनेस सेंटरमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोंढव्यातील एका ३० वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय राजाराम येरुणकर (रा. एम के फिटनेस, सुखसागरनगर, कात्रज) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एम के फिटनेस येथे गेल्या होत्या. त्यांना पाहून आरोपी संजय येरुणकर यांनी त्याच्या अंगावरील कपडे काढून नग्न झाला. तसेच अश्लिल वर्तन करु लागला. फिर्यादी यांनी जाब विचारताच त्यांना घाणेरड्या शिव्या देण्यास सुरुवात केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करत आहेत.