बापू मुळीक
सासवड (पुणे) : शुन्य टक्के एनपीए ठेवल्याबद्दल पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनकडून संत सोपानकाका सहकारी बँक लि., सासवड या बँकेला शनिवारी (दि २८) खासदार आणि सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे येथील विजय तेंडुलकर सभागृहात हा सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी सहकार आयुक्त दिपक तावरे, प्रशासकीय अधिकारी अनिल कवडे, सतिश मराठे, डॉ हेमा यादव, बाळासाहेब अनास्कर उपस्थित होते. संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया, उपाध्यक्ष शिवाजी ढमढेरे, संचालिका व व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या राजवर्धिनी जगताप, संचालक धनंजय काकडे, राजेंद्र बडदे, अॅड युवराज वारघडे, मार्तंड भोंडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साबणे, मुख्य अधिकारी गणेश मोहोळ, विश्वजीत आनंदे आदी याप्रसंगी उपस्थित होते.