सध्या चहा पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याचा वर्गही मोठा आहे. मात्र, आता आपले आरोग्य राखण्यासाठी आपण अनेक प्रकारचे हर्बल टी पितो. तो आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचाही असतो. पण तुम्ही कधी कमळाच्या पानांचा चहा प्यायला आहे का? कमळाच्या पानांच्या चहामध्ये अनेक पोषक घटक आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
कमळाचा चहा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. कमळाच्या पानांमध्ये पोषकतत्व असतात, जे चरबी कमी करण्यास आणि चयापचय वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी करणे सोपे होते. हृदयाचे आरोग्यही सुधारते. या चहामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करून हृदयाचे आरोग्य राखतात. इतकेच नाहीतर रक्तदाबही नियंत्रित ठेवतात. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि उच्च रक्तदाब रोखण्यास मदत करते.
कमळाची पाने हे नैसर्गिक डिटॉक्स एजंट असतात. जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात, त्यामुळे त्वचा सुधारते आणि शरीर ताजेतवाने वाटते. यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.