युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्यात टाकळी हाजी, कान्हूर मेसाई व कवठे येमाई या ठिकाणी नवरात्रीमध्ये जगदंबेचा जागर होत असतो. नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रीच्या कार्यक्रमात नऊ रंगाची क्रेझ पहावयास मिळणार आहे. दरवर्षाप्रमाणे महिलांमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी ठरलेल्या रंगाच्या साड्यांची मागणी वाढली आहे. शहराबरोबर खेड्यांमध्ये अशा प्रकारच्या सांड्याचा खप होताना पहावयास मिळत आहे.
नवरात्रीच्या उत्सवात उपवास व आराधनेला महत्व दिले जाते. पहाटे अनवाणी पायी जाऊन जगदंबेची आरतीसाठी मो्ठ्या प्रमाणात गर्दी होताना पहावयास मिळते. कवठे येमाई येथे श्री येमाई देवी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कान्हूर मेसाई येथील श्री मेसाई देवी मंदिरात देखील भावीक भक्त गर्दी करताना दिसतात. टाकळी हाजी येथील श्री मळगंगा देवी व जगप्रसिद्ध रांजणखळगे व झुलता पूल पाहण्यासाठी पर्यटक व भावीक गर्दी करतात.
या ठिकाणी देखील उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या काळात ठराविक रंगाच्या साड्या परिधान करण्याकडे महिलांचा अधिक कल असतो. नऊ दिवसांसाठी प्रत्येक दिवसाचा विशिष्ट रंग ठरवला जातो. त्याच रंगाच्या साड्या परिधान करण्याची प्रथा आहे. त्यामुळे कपड्यांच्या दुकानात महिला या साड्या खरेदी करण्याची पसंदी देत आहेत. या वर्षी फॅशनच्या दुनियेत विविध नवीन डिझाईन, प्रिंटस, ट्रेडस पहायला मिळत आहे. त्यामुळे पारंपारिकते बरोबर आधुनिक फॅशनची झलक देखील ग्राहकांना मिळते. साध्या साड्यापासून जरी, भरजरी, सांड्यापर्यंत सर्व प्रकार उपलब्ध असल्याचे दुकानदार सांगतात.
नऊ दिवसांचे नऊ रंग
पहिला दिवस : पिवळा
दुसरा दिवस : हिरवा
तिसरा दिवस : राखाडी
चौथा दिवस : संत्रा
पाचवा दिवस : पांढरा
सहावा दिवस : लाल
सातवा दिवस : रॅायल ब्लू
आठवा दिवस : गुलाबी
नववा दिवस : जांभळा