विजय लोखंडे
वाघोली : वाघोली येथील माजी जि. प. सदस्य रामभाऊ दाभाडे व माजी उपसरपंच महेंद्र भाडळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. केसनंद फाट्यालगतची साडेतीन एकर जागा ग्रामीण रुणालय व ‘ट्रॉमा केअर युनिट’ बांधकामाच्या प्रयोजनार्थ जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुगणालय पुणे यांच्या नावाने हस्तांतरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. लवकरच ग्रामीण रुणालय व ‘ट्रॉमा केअर युनिट’ सुरु होणार असल्याची माहिती रामभाऊ दाभाडे यांनी दिली आहे.
वाघोलीतील केसनंद फाट्यावर असणाऱ्या साडेतीन एकर गायरान जागेमध्ये सिविल हॉस्पिटल व ‘ट्रॉमा केअर युनिट’ सुरु करावे या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे व माजी उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचेकडे मागणी केली होती. आरोग्यमंत्री सावंत यांच्या माध्यमातून दाभाडे यांचेकडून प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
रामभाऊ दाभाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून वाघोली येथे ‘एक विशेष बाब’ म्हणून ‘ट्रॉमा केअर युनिट’साठी वाघोली येथे येथे केसनंद फाट्यालगत (गट नं. १११९ व ११२३) तीन एकर सतरा आर ग्रामीण रुणालय व ‘ट्रॉमा केअर युनिट’बांधकामासाच्या प्रयोजनार्थ जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुगणालय पुणे यांच्या नावाने हस्तांतरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
वाघोली येथे केसनंद फाट्यालगत (गट नं. १११९ व ११२३) साडेतीन एकर गायरान जागा आहे. वाघोली ग्रामपंचायत असताना या जागेवर माजी जि. प. सदस्य दाभाडे यांच्या पुढाकाराने प्रशस्त असे ग्रामसचिवालय उभारण्यात येणार होते. यासाठी साडेतीन एकर जागा महाराष्ट्र शासनाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नावे वर्ग देखील करून घेतली होती. परंतु वाघोली गावचा महापालिकेमध्ये सामवेश झाला आणि ग्रामसचिवालय होऊ शकले नाही.
त्यानंतर दाभाडे यांनी सदर जागेवर सिविल हॉस्पिटल व ‘ट्रॉमा केअर युनिट’ सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सकारात्मकता दर्शवली होती. त्यानुसार दाभाडे यांनी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय स्तरावरील पाठपुरावा सुरूच ठेवला होता.
वाघोली येथे ‘एक विशेष बाब’ म्हणून ‘ट्रॉमा सेंटर युनिट’
या स्थापनेबाबत शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. सदर ‘ट्रॉमा केअर युनिट’ करता विविध पद्धतीने जागा उपलब्ध करून तेथे बांधकाम व पद निर्मिती करणेबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल असे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले होते. अखेर दाभाडे व भाडळे यांच्या पाठपुराव्यला यश मिळाले असून ‘ट्रॉमा केअर युनिट’ बांधकामासाच्या प्रयोजनार्थ जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुगणालय पुणे यांच्या नावाने हस्तांतरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
सर्व सुविधांचे होणार उपलब्ध :
वाघोली गाव पुणे-नगर महामार्गावरील मुख्य गाव आहे. वाघोली गावाची लोकसंख्या दोसाडेतीन लाखा इतकी आहे. तसेच वाघोली गावाला जोडणारी पूर्व भागातील २५ गावे आहेत. वाघोली गावात सर्व प्रकारच्या सोयीसुविधा असणारे कोणतेही शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर, शिरूर व नगरहून येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी पुणे येथील सिविल हॉस्पिटलमध्ये जावे लागते. पुण्यामध्ये जाण्यासाठी वाघोली मधूनच रुग्णांना जावे लागते.
वाहतूक कोंडीमुळे कित्येक रुग्णांना वेळेमध्ये उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळावा व आर्थिक बचत व्हावी या उद्देशाने जि.प. सदस्य रामभाऊ यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आमदार राहुल कुल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे दाभाडे व भाडळे यांनी पाठपुरावा केला होता.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मागणीची दखल घेवून वाघोली येथे ‘विशेष बाब’ म्हणून जिल्हा रुगणालय व ‘ट्रॉमा केअर युनिट’ मंजूर करून देण्यापासून ते जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाघोलीकरांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो.
रामभाऊ दाभाडे, माजी जि.प. सदस्य,वाघोली