अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : अंधाराचा फायदा घेत दि. २५ सप्टेंबर रोजी अज्ञात इसमाने शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येतील येथल माळेमाळ्याच्या हद्दीत ओढ्याच्या पाण्यामध्ये केमिकल सोडून पाणी दूषित करून निसर्गास हानी पोहोचवली असून ही संपूर्ण घटना गुरुवारी नागरिकांच्या निदर्शनास आली असून ओढ्यात केमिकल सोडल्याने ओढ्यातील पाणी दुषित झाले आहे. त्या केमिकलमुळे पाण्याचा रंग लालसर होवुन सदरच्या दुषित पाण्यामुळे ओढ्यातील वनस्पती करपटुन, मासे मरण पावले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मानवी व प्राण्यांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार असून केमिकल युक्त पाण्यामुळे वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे पाणी पुढे माळीमळा, चव्हाण वस्ती, पवार वस्ती, शिंदे वस्ती, गोपाळ वस्ती, भागवत वस्ती, मराठे वस्ती ,येळे वस्ती, म्हाळुंगी पारोडी येथे जाऊन या ओढ्याचे पाणी भीमा नदी पात्रात जाऊन मिळते. भीमा नदीच्या पाण्याचा आजुबाजुच्या गावांना पिण्यासाठी व वापरासाठी पुरवठा होत असल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी त्वरित या सर्व प्रकाराची दखल घेतली.
त्यांनी गुरुवारी पुणे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय येथे जाऊन अधिकाऱ्याची भेट घेऊन प्रदूषित पाण्याबद्दल ग्रामपंचायत तर्फे निवेदन दिले. ओढ्यात येणाऱ्या केमिकल युक्त प्रदूषित पाण्याचे त्वरित व्यवस्था करावी असे निवेदन दिले आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की केमिकल युक्त पाण्याची त्वरित पाहणी करून संबंधितावर कारवाई केली जाईल अशे आश्वासन अधिकाऱ्यांनी सरपंच बापूसाहेब काळे यांना दिले आहे. बापूसाहेब काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की केमिकल सोडणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात आम्ही शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.