नवी दिल्ली : सध्या अनेक लॅपटॉप मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात आता Acer ने आपला नवीन Aspire 7 हा लॅपटॉप लाँच केला आहे. या लॅपटॉपमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 15.6 इंच डिस्प्ले देण्यात आला असून, हा डिस्प्ले फुल एचडी असणार आहे.
Acer च्या या लॅपटॉपमध्ये पूर्ण-आकाराचा बॅकलिट की-बोर्ड आहे ज्यात डेडिकेटेड नंबरपॅड आहे. यात ड्युअल स्टीरिओ स्पीकर असून, एक मेगापिक्सेलचा वेबकॅमही देण्यात आला आहे. त्याचे वजन फक्त 1.99 किलो आहे. यात 13 एडिशन असून, तो Intel Core i5 प्रोसेसर आहे. यामध्ये, युजर्सला 4GB VRAM सह NVIDIA GeForce RTX 2050 GPU किंवा 6GB VRAM सह GeForce RTX 3050 निवडण्याचा पर्याय मिळणार आहे.
यात 16GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेज असून, 54 Wh बॅटरी देण्यात आली आहे. जी पूर्ण चार्ज केल्यावर 7 तास टिकते असा कंपनीचा दावा आहे. हा लॅपटॉप Windows 11 OS सह येतो. यामध्ये उपलब्ध असलेल्या कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये WiFi-6, USB 3.2 Type-C, Type-A पोर्ट, HDMI, इथरनेट आणि ब्लूटूथसारख्या पर्यायांचा समावेश आहे.