पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. कारण, महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर येथे पीजीएमओ, निवासी भूलतज्ज्ञ आणि निवासी रेडिओलॉजिस्ट या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सोलापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
मुलाखतीसाठी वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, इसिस हॉस्पिटल, होटगी रोड सोलापूर ४१३००३ येथे जावं लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विशेषज्ञ, पीजीएमओ, निवासी भूलतज्ज्ञ आणि निवासी रेडिओलॉजिस्ट.
– एकूण रिक्त पदे : 12 पदे.
– नोकरीचे ठिकाण : सोलापूर.
– शैक्षणिक पात्रता : पीजी पदवीसह एमबीबीएस.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 01 ऑक्टोबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, इसिस हॉस्पिटल, होटगी रोड सोलापूर ४१३००३.