थेऊरफाटा : कुंजीरवाडी (ता. हवेली ) येथील श्रीनाथ पतसंस्थेला सन 2023-2024 या आर्थिक वर्षात 1.40 कोटी रुपये निव्वळ नफा होऊन संस्थेच्या सभासंदाना 14 टक्के लाभांश संस्थेचे संस्थापक चेअरमन संदीप धुमाळ यांनी जाहीर केला. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या श्रीनाथ पतसंस्थेची 24 वी वार्षिक साधारण सभा ‘हॉटेल एस ४ जी, पुणे-सोलापूर रोड, थेऊरफाटा येथे रविवारी (दि. २२) आयोजीत केली होती.
संस्था आपल्या बँकिंग कार्या सोबत सामाजिक बांधिलकीची जोपासना अतिशय समर्थपणे करीत आहे. या वार्षिक सभेच्या निमिताने विविध सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारे मान्यवर आणि विध्यार्थ्यांचे ‘श्रीनाथ गुण गौरव पुरस्कार (2024) देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये यशवंत सहकारी कारखाना थेऊर चे नवनिर्वाचित चेअरमन सुभाष जगताप, तसेच संचालक नवनाथ काकडे, शशिकांत चौधरी, योगेश काळभोर, हेमताई काळभोर, रत्नाताई काळभोर, अमोल हरपळे, गोते यांचा सन्मान करण्यात आला.
या बरोबरच पंचक्रोशीतील विद्यार्थी गुणवंताचा सन्मान करण्यात आला. विशेष कार्य सन्मान यामध्ये ज्ञानेश्वर धुमाळ, गणेश आंबेकर, एकनाथ कदम व शारदा तावंरे यांचा सन्मान करण्यात आला.
पतसंस्थेला 2023-2024 या वर्षात 1.40 कोटींचा निव्वळ नफा झाल्याचा सांगून पतसंस्थेच्या 31 मार्च 2024 अखेर 38 कोटी 85 लाख रुपयांच्या ठेवी, 28 कोटी 66 लाख रुपयाचे कर्ज वाटप, तसेच 23 कोटी 70 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. संस्थेचे एकूण खेळते भांडवल 55 कोटी 56 लाख असून संस्थेची वसुली 91. 67 टक्के असून एनपीए 0 टक्के आहे. याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन संदीप धुमाळ यांनी दिली. सभेचे अहवाल वाचन व सूत्र संचालन संस्थेचे कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळ यांनी केले .
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन संदीप धुमाळ होते. यावेळी व्हा. चेअरमन संभाजी आंबेकर, कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळ, जेष्ठ संचालक महादेव धुमाळ, मा. सरपंच सचिन तुपे, परिस फाऊंडेशन अध्यक्षा आणि मा. सरपंच सुनीता धुमाळ आणि व्यवस्थापक शिवाजी जवळे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.