पुणे : पुण्यातील डॅशिंग अन् आक्रमक नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आता पुन्हा एकदा वसंत मोरे यांनी कात्रजमध्ये एका गाईच्या गोठ्यावर हातोडा चालवला आहे. त्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
कात्रजमधील मांगडेवाडी परिसरातील एका गोठ्यात शनिवारी गाईची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वसंत मोरे आणि त्यांचे काही कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्या गोठ्यावर हातोडा चालवला. तसेच या व्यक्तीच्या मागे आणखी कोण, कोण आहेत? त्याचा शोध घ्यावा, पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका वसंत मोरे यांनी घेतली आहे.
यावेळी गाईची हत्या करणार व्यक्ती हिंदू धर्मातील असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला. त्या ठिकाणी आता पुणे मनपाने कारवाई करावी. या ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम पाडावे, अशी मागणी मोरे यांनी केली. गोठ्याचे बांधकाम अवैध आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्याने रिपोर्ट द्यावा, असे वसंत मोरे यांनी पोलिसांना दूरध्वनीवरुन सांगितले. हा व्यक्ती दुसऱ्यांदा असाच गुन्हा करताना सापडला आहे. त्याचे हे प्रकार वाढत आहेत, असंही वसंत मोरे यांनी सांगितलं.
गोवंश हत्या आणि गोहत्या याच्या विरोधात आमचा हातोडा चालणारच… pic.twitter.com/Hw8eEjLkja
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) September 21, 2024