मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची नुकतीच बैठक पार पडली आहे. या बैठकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यावर तसेच गुन्हे मागे घेण्यावर चर्चा झाली आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर याबाबत चर्चा होईल, असे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिले आहे. पुण्यातून आलेल्या सात सदस्यांच्या मंडळाने वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्र्यांसमवेत एक बैठक पार पडली. या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या संदर्भात झाली चर्चा
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सविस्तर चर्चा झाली? तसेच गतीने कार्यवाही व्हावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे. तसेच पुढे बोलताना म्हणाले, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आम्ही काम वेगाने सुरू केले आहे.
मात्र, दोन वेगळे विषय आहेत. मराठा समजाला आरक्षण मिळावे अशी पहिली मागणी होती. त्याप्रमाणे ती मागणी पूर्ण केली आहे. मराठा समजाला दहा टक्के आरक्षण दिले आणि ते टिकले. ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लावलाय ते सांगा, कुठेही धक्का लावला नाही. दुसऱ्या कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले आहे. आता सगेसोयरे आणि हैद्राबाद गॅजेट लागू करावे, अशी मागणी असल्याचे शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.