-विजय लोखंडे
वाघोली : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ओबीसी सेलचे वरिष्ठ पदाधिकारी ईश्वर बाळबुधे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सचिव संदिप थोरात यांनी हातात तुतारी स्वीकारली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते तर माजी ग्रहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षात मुंबई येथे जाहीर प्रवेश केला.
यावेळी माजी चेअरमन देवदत्त निकम, राष्ट्रवादी(शरद पवार) ओबीसी सेलचे पुणे शहर उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे, संतोष राऊत, वाघोलीचे युवा नेते गौरव उबाळे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यालयात इतर पक्षातून आलेल्या राज्यभरातील व पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही प्रवेश पार पडला, अशी माहिती उबाळे यांनी दिली.
आम्ही शरद पवार, जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणात आल्यापासून पक्षनिष्ठ काम करीत असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष पुणे जिल्ह्यात वाढविण्यासाठी काम करीत आहोत. याबरोबर राष्ट्रवादी पक्षाचा ओबीसी सेलही जिल्ह्यासह महाराष्ट्रात वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पक्षात आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आम्ही स्वागत करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत आहोत.
– शिवदास उबाळे, पुणे जिल्हाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ओबीसी सेल तथा माजी सरपंच -वाघोली