बारामती : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले दिसून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. अशातच बारामतीत लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
गुणवडी चौकात लागले बॅनर..
बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. बारामतीत लागलेले सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महायुती, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?
सद्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपलाच नेता मु्ख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त करत असल्याचा दिसत आहे. सध्याच्या स्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील अशी नावे चर्चेत आहेत.