पुरंदर : पुरंदर तालुक्यातील भाजपा उपाध्यक्ष हनूमंत मुरलीधर काळाने यांनी त्यांच्या गावातील ग्रुपवर आमदार संजय जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी अजित दादा पवार यांनी पुरंदरला निधी मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबत पोस्ट ग्रुपवर पोस्ट केल्याने आमदारांनी त्यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात जावून निवेदन देण्यात आले होते. ही बाब गांभीर्याने घेत जेजुरी पोलीस स्टेशन येथे जावून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या पुढे कोणत्याही कार्यकर्त्यावर अशा पद्धतीने वाकड्यात गेल्यास त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल असा सज्जड इशारा माजी आमदार अशोक टेकवडे यांनी दिला आहे. यावेळी जालिंदर कामठे, लोकसभा समन्वय, पुरंदर भाजपा अध्यक्ष निलेश जगताप, गंगाराम जगदाळे, शेखर वढणे, श्रीकांत ताम्हाणे, सचिन लबाते, संतोष जगताप, गणेश मेमाणे, बाळासाहेब भोसले, मंगल पवार, महादेव शेंडकर, अलका शिंदे, सुरेंद्र जेधे, जालिंदर जगताप, अमोल जगताप, अरुण न्हालवे, महेश राऊत, दिलीप कटके, संदीप कटके, श्रीकांत राणे आदी उपस्थित होते. आमदार संजय जगताप यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता असे काही घडले नसल्याचे त्यांनी सांगितले.