पुणे : अहमदनगरच्या जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 17 हजारांपर्यंत पगार मिळू शकेल.
जिल्हा सिव्हिल रुग्णालय, अहमदनगर येथे तांत्रिक पर्यवेक्षक या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 17 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : तांत्रिक पर्यवेक्षक.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अहमदनगर.
– शैक्षणिक पात्रता : पदवी / वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान / रक्तसंक्रमण औषध / रक्तपेढी तंत्रज्ञान 12 वी उत्तीर्ण किंवा बी. एससी. रक्तविज्ञान आणि रक्तसंक्रमण औषध किंवा एम. एससी. रक्तसंक्रमण औषध किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा विज्ञान किंवा पीजीडीटीटीमध्ये पदव्युत्तर पदविका.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 17,000/- पर्यंत
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा रुग्णालय, तारकपूर, सावेडी रोड अहमदनगर, 414001.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://ahmednagar.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.