LifeStyle : चेहऱ्यावरील केस घालवण्यासाठी तुम्ही रेझरचा वापर करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. चेहऱ्यावरील नको असलेले केस कधीकधी सौंदर्यावर डाग ठरतात. अशा परिस्थितीत बहुतांश महिला हे नको असलेले केस काढून टाकतात. त्यासाठी रेझरचा वापर करतात.
चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी केसांच्या वाढीच्या दिशेने रेझर फिरवा. यामुळे केस मुळांपासून दूर होतील. रेझर उलट दिशेला वापरल्याने इनग्रोन केसांची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर समस्या निर्माण होऊ शकतात. चेहऱ्यावर रेझर वापरायचा असेल तर तो स्वच्छ असावा हे लक्षात ठेवा. अस्वच्छ किंवा जुन्या रेझरमुळे त्वचेवर जळजळ किंवा संसर्ग होण्याचा धोका असतो. अशा स्थितीत रेझर स्वच्छ केल्यानंतरच वापरा. वापरण्यापूर्वी ते गरम पाण्याने स्वच्छ करा.
तसेच रेझर वापरण्यापूर्वी, आपली त्वचा ओली करा आणि मॉइश्चरायझिंग क्रीम, फेस वॉश किंवा शेव्हिंग जेल लावा. यामुळे रेझर त्वचेवर सहजपणे फिरू शकेल आणि कट होण्याची शक्यता कमी होईल. असे न केल्यास कोरडी त्वचा कापण्याची भीती असते. तुम्ही रेझर वापरणार असाल तर हात हलकेच ठेवा. त्वचेवर जास्त दाब दिल्यास त्वचा कापू शकते.