युनूस तांबोळी
शिरूर : पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विशेष शैक्षणिक कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. सन २०२४ साठी जिल्ह्यातील ५९ शिक्षकांना जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आचार्य अत्रे सभागृह सासवड (ता. पुरंदर) या ठिकाणी जिल्हास्तरीय पुरस्कारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिरूर तालुक्यातील विद्याधाम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय कान्हूर मेसाई येथील प्रा. प्रकाश किसन चव्हाण यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल आमदार संजय जगताप, पुणे जि. मध्य बॅंकचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, महाराष्ट्र राज्य टीडीएफ कार्याध्यक्ष जी.के थोरात, मुख्याध्यापक महामंडळ अध्यक्ष के. एस ढोमसे, शिक्षक संघ उपाध्यक्ष सोमनाथ भंडारे यांच्या हस्ते आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रकाश चव्हाण यांनी शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. विविध सामाजिक उपक्रम, इंग्रजी विषयांचे उत्तम अध्यापन, उत्तम वक्ता, क्रीडा मार्गदर्शक, उत्तम निवेदक, व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी केलेले समाज प्रबोधन, परिसरातील जनसामान्यांशी असणारा संपर्क, सामान्य परिस्थितीतून आपल्या कष्टाच्या जोरावर शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये केलेले उल्लेखनीय काम व विध्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची शाळेत ओळख आहे.
प्रकाश चव्हाण यांना मिळालेल्या या पुरस्कारबद्दल शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार, कान्हूर मेसाईचे सरपंच चंद्रभागा खर्डे, उपसरपंच योगेश पुंडे विद्या विकास मंडळाचे अध्यक्षा अंजली घोलप, सचिव सदाशिव पुंडे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके, विद्याधाम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.