पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या दंडावर इंजेक्शन देऊन ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर बेशुद्ध अवस्थेत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना १९ फेब्रुवारी २०२१ ते २३ ओक्टोंबर २०२३ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी एका ३६ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून बंडगार्डन पोलिसांनी ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे. प्रसाद नितीन खंडाळे (वय-२१, रा. ताडीवाला रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना १४ वर्षाची मुलगी आहे. त्यांची मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिच्या दंडात बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केले. याच मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन त्याने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे शारीरीक संबंध प्रस्थापित करतानाचे तिचे न कळत फोटो देखील काढले.
दरम्यान, याबाबत कोणाला काही सांगितल्यास तसेच मी बोलावेल त्याठिकाणी भेटायला न आल्यास काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपी प्रसाद ने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.