-अमीन मुलाणी
सविंदणे (पुणे ) : पुणे प्राईम न्यूज च्या ‘इग्नायटेड स्टोअरीज’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थेऊरफाटा (ता. हवेली) या ठिकाणी नुकताच पार पडला. यावेळी प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाच्या कार्यकारणीवर पदाधिकाऱ्यांची निवड राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप यांनी जाहीर केली. प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा दक्षिण विभागात उपाध्यक्षपदी युनूस तांबोळी यांची निवड करण्यात आली. दैनिक सकाळचे निवृत्त सहयोगी संपादक रमेश डोईफोडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, आमदार अशोक पवार, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, सिने अभिनेते आरोह वेलणकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप कंद, भाजपाचे पुणे जिल्हा उत्तर विभाग अध्यक्ष शरद बुट्टे, दैनिक सकाळचे निवृत्त सहयोगी संपादक रमेश डोईफोडे, उपजिल्हा अधिकारी रामदास जगताप, प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर, हवेली तालुका अध्यक्ष संदीप बोडके, उपाध्यक्ष चंद्रकांत दुंडे, अमोल अडागळे, समन्वयक अमोल भोसले, रियाज शेख, जयदीप जाधव, सुनील सुरळकर, गोरख कामठे, विशाल कदम, हनुमंत चिकणे, भाऊसाहेब महाडिक, गौरव कवडे, युवराज काकडे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी खेड, इंदापूर, शिरूर, दौंड व भोर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले व त्यापासून पत्रकारांचे संरक्षण व्हावे. यासाठी पुढील काळात काही ठोस उपाय योजना आखण्यात येतील. त्या बरोबर सरकाराच्या माध्यमातून पत्रकारांना विविध योजना व अनुदानाच्या स्वरूपात मदत मिळवून देण्यासाठी लवकरच पुणे जिल्ह्यात पत्रकारांशी संपर्क साधण्यात येणार असल्याचे तांबोळी यांनी सांगितले.
सरकाराने विविध योजनेतून अनुदान देण्याची भुमिका घेतली आहे. लाडकी बहिन योजना सुरू केली त्याच प्रमाणे शेतकरी हा खरा अन्नदाता आहे. त्याने सेंद्रिय शेती करून मानव जातीला रासायनीक खते औषधांपासून होणारी हाणी टाळून भरघोस उत्पादन घ्यावे. सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अन्नदाता शेतकरी योजना आणून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती साठी प्रोत्साहित करावे.
– बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ कृषीतज्ञ