नवी दिल्ली : सध्या YouTube वर व्हिडिओ पाहण्याचा ट्रेंड चांगलाच वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक युजर्सकडून व्हिडिओ तयार करून पोस्ट केले जात आहेत. तुम्ही देखील YouTube वर व्हिडिओ पोस्ट करत असाल तर आता तुम्हाला यासाठी AI मदत करणार आहे. त्याने तुम्हाल मोठा फायदा होणार आहे.
आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अर्थात AI ही टेक्नॉलॉजी सध्या सर्वत्र वापरली जात आहे. YouTube देखील AI वर सतत काम करत आहे. यामध्ये YouTube ने Google Deepminds चे AI व्हिडिओ टूल Veo ला YouTube मध्ये आणले आहे. या Veo च्या मदतीने, YouTube व्हिडिओ निर्माते त्यांच्या व्हिडिओंमध्ये हाय क्वालिटी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. Google ने यावर्षी Veo लाँच केले आहे. हे कंपनीचे AI व्हिडिओ जनरेशन टूल आहे.
Veo च्या मदतीने, YouTube निर्माते AI थंबनेल्स तयार करू शकतील. याशिवाय, छोट्या क्लिप्सही देखील बनवता येणार आहे. कंपनीने यूट्यूब शॉर्ट्ससाठी आधीच AI वापरला आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते ड्रीम स्क्रीन वापरू शकतात आणि आता Veo च्या मदतीने, युजर्स कोणतेही फुटेज Edit करू शकतील आणि ते क्रिएटिव्ह बनवू शकतात. याशिवाय, तुम्ही कोणत्याही फुटेजचे रिमिक्स देखील बनवू शकता. इतकेच नाहीतर Veo च्या मदतीने यूजर्स 6 सेकंदाची क्लिप बनवू शकतात जी कॉपीराइट फ्री असेल.