पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे.
भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी (ऑर्थोपेडिक) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://secr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : व्हिजिटिंग फॅकल्टी (ऑर्थोपेडिक)
– एकूण रिक्त पदे : 01 पद.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा डीएम / एमसीएच किंवा समकक्षमध्ये पोस्ट-डॉक्टरल पात्रता.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 52,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 30-64 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2024.