नवी मुंबई: उलवे येथे मुस्लिम धर्मोयाविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्याने एनआरआय पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात दोन समाजांत तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ११ सप्टेंबर रोजी नितेश राणे यांनी उलवे सेक्टर-१९ मध्ये वादग्रस्त भाषण केले होते. त्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
उलवे येथे राहणारे संकल्प घरत यांनी त्यांच्या संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने उलवे सेक्टर-१९ मध्ये सात दिवसांच्या गणेशोत्सवाचे आयोजन केले होते. शासनाची कोणतीही परवानगी न घेता आयोजित करण्यात आलेल्या या गणेशोत्सवासाठी संकल्प घरत यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. त्यावेळी नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला उद्देशून वादग्रस्त भाषण केले होते. नितेश राणे यांनी केलेल्या मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने एनआरआय पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच गणेशोत्सवाचे आयोजक संकल्प घरत यांनादेखील त्यात सहआरोपी केले आहे.