लोणी काळभोर : कामाला चाललेल्या महिलेला राँग दिशेने भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. हि घटना पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा (कुंजीरवाडी ता. हवेली) येथे बुधवारी (ता.18) सकाळी आठ वाजण्याच्या सुमरास घडली आहे. या अपघात महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेच्या वाचविण्यासाठी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे देवदूत बनून धावून आले. त्यामुळे महिलेला वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहे. नंदा दत्तात्रय धुमाळ (वय 45 रा,धुमाळ मळा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदा धुमाळ या थेऊर (ता. हवेली) येथील डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये काम करतात. बुधवारी (ता.18) सकाळी आठ वाजण्याच्या सुमरास कामाला जाण्यासाठी नंदा धुमाळ या त्यांच्या दोन सहकारी महिलांसोबत बसची वाट पाहत थांबल्या होत्या.
दरम्यान, गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक थेऊर फाटा येथून बंद करण्यात आली होती. त्यामुळे थेऊर फाटा प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीतून लवकर सुटका व्हावी म्हणून एक ट्रक रस्त्याच्या विरुद्ध दिशने भरधाव वेगाने निघाला. या भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकने कॉर्नर हॉटेलच्या येथे बसची वाट पाहत थांबलेल्या नंदा धुमाळ यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे चाक नंदा धुमाळ यांच्या पायावरून गेले. तर धुमाळ यांच्या दोन सहकारी मैत्रिणीनी प्रसंगावधान दाखवून तात्काळ बाजूला झाल्या. त्यामुळे त्या दोघी या अपघातात सुदैवाने बचावल्या.
या अपघातात नंदा धुमाळ या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्याच वेळी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे हे व्यायाम करून घरी चालले होते. सचिन तुपे हे तात्काळ महिलेला मदतीसाठी धावून आले. त्यांनी अम्बुलन्स वाट न पाहता. अग्निशामक दलाचे जवान सुखराज खंडेराव दाभाडे यांच्या मदतीने तात्काळ एका रिक्षाची व्यवस्था केली. व महिलेला लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. नंदा धुमाळ यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
सचिन तुपे यांचे होतेय सर्वत्र कौतुक..
ट्रकच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नंदा धुमाळ यांना त्वरित वैद्यकीय मदत मिळने गरजेचे होते. हे ओळखून सचिन तुपे यांनी प्रसंगावधान दाखविले. आणि धुमाळ यांच्यासाठी अम्बुलन्स वाट न पाहता. अग्निशामक दलाचे जवान सुखराज खंडेराव दाभाडे यांच्या मदतीने तात्काळ रिक्षामधून उपचारासाठी विश्वराज हॉस्पिटलमध्ये तात्काळ घेऊन आले. त्यामुळे नंदा धुमाळ यांना त्वरित उपचार मिळाले आहेत. त्यामुळे नंदा धुमाळ यांचे प्राण वाचले आहे. कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे हे मागील 20 वर्षापासून नागरिकांना सर्वोतोपरी मदत करीत आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्यांची सर्वसामान्यांचा आरोग्यदूत म्हणून अशी ओळख होत चालली आहे.