जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्ता शहर ५.६ रिश्टर स्केलच्या धक्क्यांनी हादरले. पश्चिम जावा येथे १० किमी खोलीवर भूकंपाचे केंद्र होते.
या धक्क्यामुळे जकार्ता शहरात २० जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३०० लोक जखमी झाले आहेत. मात्र, या भूकंपांमुळे त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जकार्ता येथे शुक्रवारी संध्यकाळी भूकंपाचे धक्के जनाविन्यास सुरुवात झाली. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी हा भूकंप झाला. भारतात देखील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल मोजण्यात आली होती.
मागील आठवड्यात अरुणाचल प्रदेशात देखील बुधवारी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले होते. याची तीव्रता ३. ७ एवढी मोजण्यात आली होती.