दिनेश सोनवणे
दौंड : पोलीस निरीक्षक विनोद गुघे यांच्या बदलीनंतर दौंड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. सर्वांना समान न्याय मिळण्यासाठी, तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबरीने शहर आणि परिसरातील अवैध धंदे, रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून त्याबरोबरीने शहरातील वाढते चोरीचे प्रमाण पाहता रात्रीच्या वेळेस गस्त देखील वाढविण्यात येणार असल्याचे त्यांची सांगितले.
दौंड पोलीस स्टेशनने नूतन अधिकारी भाऊसाहेब पाटील हे मूळ सोलापूर जिल्ह्यातील असून सन १९९९ साली ते राज्य सेवा आयोगामार्फत पोलीस दलात रुजू झाले.
पाटील यांनी यापूर्वी सोलापूर, सातारा, गडचिरोली, अधीक्षक कार्यलय पुणे, शिक्रापूर यासह दौंड तालुक्यातील यवत येथे आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. सन २०१७ साली पोलीस महासंचालक पदक तसेच विशेष सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे.