पुणे : राज्यभर गणेश उत्सवाचा बोलबाला आहे. सर्व भाविक मोठ्या आंनदाने गेले 10 दिवस झाले बाप्पाच्या उत्सवात दंगून गेले होते. आता मात्र बाप्पाच्या विर्जनाची वेळ येऊन ठेपली आहे. 10 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची सांगता गणपती बाप्पाच्या विसर्जनाने होणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणेश विसर्जन केले जात असते. त्या दिवशी अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. ज्या भाविकांच्या घरी बाप्पा 10 दिवस बसतात ते अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करत असतात. लोक गणपती बाप्पाला आनंदाने निरोप देतात आणि पुढच्या वर्षी लवकर येण्यास सांगतात. तर गणेश विसर्जनाची तिथी आणि मुहूर्त कधी आहे? जाणून घेऊ..
गणेश विसर्जन तिथी..
यंदा गणेश विसर्जन मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी आहे. त्या दिवशीच अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी आवश्यक भाद्रपद शुक्ल चतुर्दशी तिथी सोमवार, 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3:10 ते मंगळवार, 17 ऑगस्ट रोजी रात्री 11:44 पर्यंत असणार आहे.
गणेश विसर्जन मुहूर्त :
यंदा तुम्ही गणेश विसर्जन सूर्योदयानंतर म्हणजेच सकाळी 06.07 पासून करू शकता. त्या दिवशी अनंत चतुर्दशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:07 ते 11:44 पर्यंत असणार आहे.
गणेश विसर्जनासाठी चौघडिया शुभ मुहूर्त :
- सकाळचा मुहूर्त (चर, लाभ, अमृत): सकाळी 09:11 ते दुपारी 01:47
- दुपारचा मुहूर्त (शुभ): दुपारी 03:19 ते दुपारी 04:51 पर्यंत
- संध्याकाळचा मुहूर्त (लाभ): 07:51 PM ते 09:19 PM
- रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चर): रात्री 10:47 ते 03:12 AM
दिवसाचा शुभ चौघडिया मुहूर्त :
- चर-सामान्य मुहूर्त: सकाळी 09:11 ते सकाळी 10:43
- लाभ-उन्नती मुहूर्त: सकाळी 10:43 ते दुपारी 12:15
- अमृत-सर्वोत्तम मुहूर्त: दुपारी 12:15 ते दुपारी 01:47
- शुभ वेळ: दुपारी 03:19 ते दुपारी 04:51 पर्यंत
रवियोगात गणेश विसर्जन –
यंदा गणेश विसर्जनाच्या दिवशी रवियोग तयार होत आहे. त्या दिवशी रवि योग सकाळी 06:07 ते दुपारी 01:53 पर्यंत असेल. गणेश विसर्जनासाठी ही सकाळची शुभ वेळ आहे.
गणेश विसर्जन मंत्र कोणता म्हणाल?
1. ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
2. गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर!
मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च।।