लोणी काळभोर : आपण दान केलेले रक्त एखाद्याचे जीव वाचवू शकते किंवा एखाद्या गंभीर परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला मदत करू शकते. आपण रक्तदान शिबिराच्या माध्यमातून लोकांचे प्राण वाचवले पाहिजे. या हेतूने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्री वेंकटेश जोयनेस्ट गणेश उत्सव कमिटीने रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्पुर्त प्रतिसाद दिला आहे.
श्री वेंकटेश जॉयनेस्ट गणेश उत्सव कमिटी व रुबी हॉल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.15) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 51 बाटल्यांचे रक्त संकलित करण्यात आले. यामध्ये तरुण व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. श्री वेंकटेश जॉयनेस्ट गणेश उत्सव कमिटी हा समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, ग्रँड मेडिसिन एज्युकेशनच्या रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली. यामध्ये सिबिल, बी एस एल (एफ), बी एस एल (बीपी) क्रिटीनाईन, इसिजी, लिपिड प्रोफाइल, फिजिशियन चेकअप या तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर डॉक्टरांनी नागरिकांना सल्ला दिला. या रक्तदान शिबिरासाठी श्री वेंकटेश जॉयनेस्ट गणेश उत्सव कमिटी व रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांचे बहुमुल्य योगदान मिळाले.