लहू चव्हाण
पाचगणी : येथील बिल्लीमोरीया हायस्कुलच्या क्रीडा – संकुलात आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील गटात बिल्लीमोरीया हायस्कुल संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.
येथील बिल्लीमोरीया हायस्कुलच्या क्रीडा – संकुलात तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन बिलीमोरीया हायस्कूलचे चेअरमन अरुणभाई गोराडीया यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हायस्कूलच्या संचालिका अदिती गोराडीया, व्यवस्थापक पंकज चव्हाण, मुख्याध्यापक विशाल कानडे, शैक्षणीक व्यवस्थापक गणेश फरांदे व शिक्षक वृंद उपस्थित होते. स्पर्धेसाठी तालुक्यातील अनेक शाळांचे संघ सहभागी झाले होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बिल्लीमोरीया हायस्कूलचे क्रीडा प्रमुख सुनील हिरेमठ यांनी विशेष परिश्रम घेतले. बिल्लीमोरीया हायस्कूलचे क्रीडा शिक्षक राहुल कांबळे यांनी विशेष भूमिका बजावली. स्पर्धेला पंच म्हणून नितीन सपकाळ, प्रकाश भोसले, अनिल वन्ने यांनी काम पाहिले.
स्पर्धेसाठी सेंट झेवियर्स हायस्कुलचे व्यवस्थापक जोजन सर, विद्यानिकेतन हायस्कूलचे प्रिन्सिपॉल शिवाजी जाधव, विद्यानिकेतन सिबिईसी स्कूलचे प्रिन्सिपॉल प्रशांत होमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत बिल्लीमोरीया हायस्कुलचे धवल यश…
म्हसवड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय रायफल शुटींग स्पर्धेत बिल्लीमोरीया हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी धवल यश प्राप्त केले. स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कु. पृथ्वीराज कापसे याने कांस्यपदक पटकावले.
१४ वर्षा खालील मुलींच्या गटात कु. अन्वी हांडे आणि कृष्णा नायर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवले. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात डेलनाज वाडिया हिने कांस्य पटकावले.
सर्व विजेत्या खेळाडूंचे व त्यांचे प्रशिक्षक श्रीमंत कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.