-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर येथे अंमली पदार्थाचे सेवन करण्याचे साहित्य बाळगून गांजाचे सेवन करणाऱ्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, रघुनाथ भिमराव हाळनोर (वय- 35, व्यवसाय नोकरी, पोलीस कॉन्सटेबल ब.नं. 1541, नेमणुक शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आसीफ रफिक शेख (वय 27 रा. हल्दी मोहल्ला, शिरूर ता. शिरूर जि. पुणे), वशीम इक्बाल शेख (वय 32 रा. हुडको कॉलनी शिरूर ता. शिरूर जि. पुणे), उमेश संभाजी गडकर (वय 32 रा. गुजरमळा शिरूर ता. शिरूर जि. पुणे), दत्तात्रय काशीनाथ गुळादे (वय 43 रा. साईनगर शिरूर ता. शिरूर जि. पुणे), दिनेश राम लोखंडे (वय 28 रा. सिध्दार्थ नगर शिरूर ता. शिरूर जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बुधवार (दि. 11 सप्टेंबर) रोजी साडेपाचच्या सुमारास कुंभार आळी येथील दशक्रिया घाटावर आडोशला सार्वजनिक ठिकाणी आरोपी हे अंमलीपदार्थाचे सेवन करत असताना दिसून आले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करत आहे.