पुणे : पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे धोतर फेडणाऱ्यांवर १ लाखांचे बक्षीस ठेवले आहे.
शनिवारी (ता. १९) औरंगाबादमधील विद्यापीठातील कार्यक्रमात त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक बोलल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात संतापची लाट उसळली आहे.
भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये ‘राज्यपाल आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत आता नवे आदर्श गडकरी आणि शरद पवार हे तुमच्यासमोर बसले आहेत’ असे विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते. त्या विरोधात आता संभाजी ब्रिगेडसारख्या अनेक संघटना आक्रमक झाल्या असून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडूनसुद्धा बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नेहमी चर्चेत असतात. पुण्यातील वेगवेगळ्या मुख्य पाच चौकांमध्ये असे बॅनर लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हे बक्षीस जाहीर केलं आहे.
त्यामुळे राज्यपालांच्या वक्तव्यावरचा वाद आता चांगला चिघळताना दिसत आहे.