उत्तर प्रदेश : आपल्या देशामध्ये आपण विविध धर्मातील धर्मगुरूंना मोठ्या आदराने बघत असतो. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर असतो. परंतु आपल्या आदराला काही धर्मगुरू जागत नाहीत. अशाच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या धर्मगुरुच कृत्य समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील एका गावात असलेल्या मदरश्यामध्ये शिकणाऱ्या 12 वर्षांच्या विद्यार्थिनीवर मौलानाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पीडितेच्या सोबत शिकणारी सर्व मुलं घरी गेल्यानंतर तिची अडवणूक करून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आहे. पीडितेने घरी गेल्यानंतर कुटुंबीयांना याबाबत सर्व माहिती दिली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी उरुवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहत असून ती गावातील मदरश्यामध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती. 9 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे ती मदरशात गेली होती. अभ्यास केल्यानंतर सर्व मुलं आपापल्या घरी निघाली असताना तेव्हा आरोपी मौलानाने पीडितेला काहीतरी कारण देऊन थांबवून घेतलं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच हा प्रकार इतरांना सांगितला तर आरोपीने जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती.
आरोपीला अटक..
पीडित विद्यार्थिनी घरी गेल्यानंतर तिने रडतरडत हा सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. मुलीच्या आईने तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तक्रार दाखल केली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून उरुवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मौलाना रहमत अली याला अटक केली आहे.
गोरखपूरचे एसपी दक्षिण जितेंद्र कुमार यांनी सांगितलं की, उरुवा पोलीस स्टेशन परिसरातील गावात राहणाऱ्या एका महिलेने 9 सप्टेंबर रोजी तक्रार दिली आहे. 12 वर्षांच्या मुलीवर मदरशातील मौलानाने बलात्कार केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी, मॅजिस्ट्रेटसमोर पीडितेचा जबाब घेण्यात आला आहे. तिची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आलिया आहे.