शिक्रापूर : तांदळी (ता. शिरूर) सह इनामगाव व मांडवगण फराटा येथे काही इसम देशी विदेशी दारूच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती शिरुर पोलिसांना मिळाली. त्यांनतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कदम यांनी तांदळी सह इनामगाव व मांडवगण फराटा या गावामध्ये जाऊन छापे टाकले. यावेळी तांदळी येथे हॉटेल शिवारच्या आडोशाला प्रज्वल भालेराव हा तर इनामगाव येथील विराज हॉटेल येथे संदीप विटेकर तसेच हॉटेल जय मल्हार येथे जालिंदर साळुंखे आणि मांडवगण फराटा येथील राजमुद्रा हॉटेल येथे सुखदेव चुमन हा नागरिकांना देशीं विदेशी दारुच्या बाटल्यांची विक्री करताना मिळून आले. यावेळी पोलिसांनी तिघांना वेगवेगळ्या ठिकाणहून ताब्यात घेत दारुसाठा जप्त केला.
या छाप्यानंतर पोलिसांनी गणेश सुखदेव चुमन (वय २१ रा. जगतापवाडी मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे), प्रज्वल संतोष भालेराव (वय २२) व संदीप बबन विटेकर (वय ३४), जालिंदर गुलाबराव साळुंखे (वय ४४ तिघे रा. इनामगाव ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस करत आहेत. या कारवाइत पोलीस हवालदार संपत खबाले, अमोल गवळी, किशोर वाघ, भाऊसाहेब टेंगले, तानाजी बाबर यांनी भाग घेतला.