मुरादाबाद : तंत्रज्ञान ज्या पद्धतीने विकसित होत आहे,त्याच पद्धतीने तरुणांमध्ये नवीन वेगळे करण्याची संकल्पना येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण नवनवीन गोष्टी शोधत आहेत. त्यापैकी एक म्हणजे लाकडी बुलेट. जी दुरून पाहिल्यास मूळ बुलेटसारखी दिसते. मुरादाबाद येथील ही लाकडी बुलेट सर्वाचे आकर्षण ठरली आहे. सध्या या बुलेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील जुनैद सैफी नावाच्या तरुणाने ही कमाल केली. त्याने तयार केलेली बुलेट प्रत्येक जण बघतच राहतो. जुनैदने बुलेट तयार करण्यासाठी लाकडाचा वापर केला. यासाठी त्याने तीन महिने काम केले.
बुलेट तयार झाल्यानंतर बिजनौरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले. प्रत्येक जण या बुलेटसमोर उभा राहून सेल्फी घेत आहे. जुनेद हा व्यवसायाने सुतार आहे. नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा विचार जुनैदच्या मनात होता.
त्यानंतर त्याने मूळ बुलेटमध्ये बदल करून तिला लाकडाची केली. इतकेच नव्हे तर त्याने लाकडापासून हेल्मेट तयार केले आहे. जुनैदला या बुलेटसाठी ८० ते ९० हजार रुपयांचा खर्च झाला आहे.
#bullet #bullet wood 🪵 #BIJNOR BULLET #Good work
“bike out of wood! His creativity and craftsmanship are truly impressive! pic.twitter.com/NTK3USMdrV— Salman Khan (@salmanss9319) September 5, 2024