दौंड : मौजे केडगाव येथील गट नंबर 93 (भोगवटा वर्ग 2 क्षेत्र) 75 आर शेत जमिनीसंदर्भात तीन व्यक्तींवर फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोहित चंद्रकांत गजरमल (वय-31, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांनी मनोहर हिरामण कांबळे (रा. केडगाव, ता. दौंड, जि.पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादीचे वडील चंद्रकांत गजरमल (दि.06 जून) यांच्या घरी तनुजा कांबळे आल्यावर त्यांनी सांगितले की, माझे पती मनोहर कांबळे यांनी आमची मौजे केडगाव गावच्या हद्दीत (भोगवटा वर्ग 2) शेत जमीन गट नंबर 93 मधील क्षेत्र 48 आर पोट खराबा 27 आर असे एकूण 75 आर शेत जमीन ही गणेश बोरकर (रा. कुरुळी ता. शिरुर जि. पुणे) यांना 5 लाख रुपये देऊन (दि. 19 डिसेंबर) केडगाव येथे विसार पावती करुन देण्यात आली आहे.
यावेळी गणेश बोरकर यांनी अधिक माहितीसाठी सर्च रिपोर्ट काढून त्यासंदर्भात चौकशी केली. त्यानंतर त्यांना समजले की यापूर्वी मनोहर कांबळे यांनी सदरची शेत जमीन ही बिनताबा साठेखत करुन दिलेली आहे. तरी देखील तो शेत जमिनीचे साठेखत करुन मागत आहे. यापूर्वी केलेले बिनताबा साठेखत हे रामचंद्र गरदडे व कुलमुखत्यारपत्र शरद सोडनवर यांना करून दिलेली आहे. हे रद्द करायचे असल्याने त्यांच्याकडून यापूर्वी घेतलेली रक्कम द्यायची असल्याने तुम्ही मला 22 लाख रूपये देवून सदरची शेत जमीन ही गणेश बोरकर यांचे ही विसार पावती रद्द करा. तसेच तुमच्या नावाने बिनतांबा साठेखत करून देत असल्याचे मनोहर कांबळे आणि तनुजा कांबळे यांनी सांगितले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच रामचंद्र गरदडे यांच्याकडून या पूर्वी घेतलेली रोख रक्कम परत देऊन साठेखत रद्द करू. तसेच शरद सोडनवर यांचे ही रोख रक्कम परत देऊन कुलमुखत्यारपत्र रद्द करू. तुम्हाला केडगाव दुय्यम निबंधक कार्यालयात इसार पावती कुलमुखत्यारप करून देतो. तसेच 75 आर शेत जमिनीचे एकुण रक्कम 38 लाख रूपये ठरविण्यात आली होती. गणेश बोरकरला ही त्याच रक्कमेत शेत जमीन ठरवली होती. तुम्ही 38 लाख रुपये पैकी आता 22 लाख रूपये द्या व उर्वरीत रक्कम (भोगवटा वर्ग 2 ची ) परवानगी आल्यानंतर खरेदी खत करते वेळी 16 लाख रूपये द्या, असे आरोपी कडून सांगण्यात आले. (दि. 02 जुलै) माझे साठेखत व कुलमुखत्यारपत्र करणे असल्याने मी माझा मित्र संदिप परभाने, मनोहर कांबळे, रामचंद्र गरंदडे, शरद सोडनबर असे आम्ही केडगाव दुय्यम निबंधक कार्यालयजवळ गेलो.
त्यावेळी मनोहर कांबळे म्हणाले की, पूर्वीचे साठेखत व कुलमुखत्यारपत्र रद्द करणे असल्याने व तुम्हाला साठेखत व कुलमुखत्यारपत्र करून देणे असल्याने त्यांचे केडगाव येथील पुणे पिपास बँकेच्या खात्यामध्ये आर. टी. जी. एस द्वारे 17 लाख रुपये पाठविले असल्याचे नमूद करण्यात आले. मनोहर कांबळे यांनी सांगितल्यावरून गणेश बोरकर यांना 5 लाख रूपये रोख स्वरूपात फिर्यादी यांचे मित्र संदिप परभाने यांच्या हस्ते 22 लाख रूपये दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मनोहर कांबळे यांनी रामचंद्र परवडे यांना पूर्वी करून दिलेले साठेखत (दि.02 जुलै) इसार पावती दस्त नंबर 4048/2024 रद्द केले. तसेच शरद सोपान सोडनवर यांना पुर्वी करून दिलेले कुलमुखत्यारपत्र (दि. 02 जुलै) रजिस्टर दस्त नंबर 4049/2024 रद्द करून घेतले. फिर्यादीचे मित्र संदिप परभाने असे दोघे जण साक्षीदार म्हणून दस्तावर सह्या केलेल्या आहेत. त्यावेळी फियादीस कुलमुखत्यारपत्र करून देतो, असे मनोहर कांबळे हा म्हणाले होते.
त्यादरम्यान, संदिप परभाने, शरद सोडनवर, रामचंद्र गरदडे हे तेथे उपस्थित होते. परंतु दुय्यम निबंधक कार्यालय केडगाव येथील कार्यालयाची वेळ संपल्यामुळे सदरचे दस्तऐवज मनोहर कांबळे यांनी फिर्यादीस दुस-या दिवशी (दि. 03 जुलै) करून देतो, असे सांगितले. (दि. 03 जुलै) फिर्यादी व मित्र संदिप परभाने, वडील चंद्रकांत गजरमल असे आम्ही मनोहर कांबळे यांचे केडगाव येथील राहत्या घरी गेलो असता त्यांची पत्नी तनुजा कांबळे यांनी आम्हांस सांगितले की, माझे पती मनोहर कांबळे हे कामानिमित्त बाहेर गावी गेले आहेत. तुझे साठेखत व कुलमुखत्यारपत्र माझे पती घरी आल्या नंतर (दि. 04 जुलै रोजी) करून देणार आहेत. असे सांगितल्याने आम्ही परत घरी निघुन गेलो. (दि. 04 जुलै) परत फिर्यादी व मित्र संदिप परभाने आम्ही मनोहर कांबळे यांचे केडगाव येथील राहत्या घरी गेलो असता ते घरीच होते. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की, तुम्ही (दि. 05 जुलै) रोजी आपले ठरल्या प्रमाणे साठेखत व कुलमुखत्यारपत्र करून ठेवू. यावर ते फिर्यादीस रागात म्हणाले की, मला सध्या अडचण आहे. तुला एवढी काय घाई झाली आहे. मी काय घर सोडुन पळुन चाललो आहे का?
त्यावेळी पोपट लाड, अक्षय गायकवाड, प्रथमेश गायकवाड, विकास कांबळे असे यांच्या सोबत बैठक झाली. सदर बैठकीत मनोहर कांबळे यांनी साठेखल कुलमुखत्यारपत्र करून देतो असे कबुल करुन फियार्दीस विश्वासात घेतले. तसेच साठेखत व कुलमुखत्यारपत्र करून न देता फिर्यादीकडून घेतलेले आर. टी. जी.एस द्वारे 17 लाख रूपये व मनोहर कांबळे यांच्या सांगण्या वरून गणेश बोरकर यास रोख स्वरूपात दिलेले 5 लाख रूपये अशी एकूण 22 लाख रुपये घेवुन फियार्दीस मौजे केडगावच्या हद्दीत शेत जमीन गट नंबर 93 मधील क्षेत्र 48 आर. पोटखराबा 27 आर असे एकुण 75 आर शेत जमीनीचे साठेखत कुलमुखत्यारपत्र करुन दिले नाही.
तसेच फियार्दीचे घेतलेले 22 लाख रूपये ही परत दिले नाहीत. तसेच फियार्दीस विश्वासात घेवुन फसवणुक केली आहे. म्हणुन मनोहर कांबळे यांच्या विरुद्ध तक्रार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपी मनोहर कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.