पुणे : गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन तर कधी पाऊस असं सुरु आहे. भारतीय हवामान खात्याने आज सोमवारी (दि.09) कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखीच तीव्र झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. भारतीय हवामान खात्याने आज सोमवारी (ता.09) कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर पालघर, ठाणे, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोलीं, नांदेड व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात मध्यम ते हलका असा पाऊस पडण्याची शक्यता आहे.