अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : सायबर गुन्हेगारांकडून अनेकांना आर्थिक गंडा घातला जात आहे. कोणत्याही गोष्टीचे अमिष दाखवून बॅंक खात्यातील पैसे लंपास केले जात आहेत. तर दुसरीकडे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना एक-दोन चुकतात आणि दुसऱ्याच व्यक्तीला पैसे जातात. अशावेळी संबंधित व्यक्तीने 1930 या क्रमांकावर लगेचच कॉल करा. आणि आपले चुकीच्या व्यक्तीला गेलेली रक्कम त्वरित थांबवा.
काही मिनिटांत रक्कम होल्डवर केली जाईल
सायबर गुन्हेगाराने एखाद्या व्यक्तीला फसवल्याचे समजताच त्वरित 1930 या क्रमांकावर कॉल करावा. त्यानंतर सायबर यंत्रणा तात्काळ कामाला लागते आणि अवघ्या ७ ते ८ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड करता येते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतो. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट करण्यात येते. त्यामुळे मनी ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.
यंत्रणा काम कशी करते?
१९३० या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ, अशी महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती. http://cybercrime.gov.in या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी ‘आररबीय’ चेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.
हेल्पलाईन फसलेल्यांसाठी सुरक्षा कवच
http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि 1939 हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एक प्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस्, पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या खूप संस्था जुळलेल्या आहेत.