पुणे : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. परंतु अशातच दुसरीकडे विधानपरिषदेसाठी पक्षातील नेत्याला विरोध होत असतानाच आता आपल्या समाजाचा आमदार व्हावा अशा मागण्या पुढे येऊ लागल्या आहेत. याचा अनुभव आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना सुद्धा आला आहे. बारामतीमध्ये आमच्या नेत्याला आमदारकी मिळावी रस्ताही अजित पवारांसमोर धनगर समाजाने जोरदार घोषणाबाजी केली आहे.
धनगर समाजाचे नेते विश्वास देवकाते यांना विधान परिषदेवरती संधी द्यावी अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार जनता दरबार घेण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे आले असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. गेल्या काही दिवसापासून विधान परिषदेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. यामध्येच पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले विश्वास देवकाते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.
हातात छोटे छोटे फ्लेक्स घेऊन घोषणा..
हातात छोटे छोटे फ्लेक्स घेऊन विश्वास देवकाते यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भावना पुढचा रस्ता अडवून धरला. धनगर समाजाचे नेते विश्वास देवकाते यांना विधान परिषदेवरती संधी द्यावी अशी मागणी करणारे फलक सुद्धा हातात बघायला मिळाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेच्या आमदारकीची संधी विश्वास देवकाते पाटील यांना मिळाली पाहिजे यासाठी समर्थकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीतील राष्ट्रवादी भवनात शक्तीप्रदर्शन केली.
अजित पवार सद्या जनसन्मान यात्रेमुळे राज्यभर दौरे करत आहे. अशातच आज त्यांनी बारामतीतील काही गणेश मंडळामध्ये जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं आणि आरती केली, त्यानंतर काही विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बारामती परिसरात असतानाच पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते पाटील यांच्या समर्थकांनी देवकाते पाटील यांना विधान परिषदेची आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी करत शक्तीप्रदर्शन केले आहे.