पुणे : पिंपरी चिंचवड येथून खळबळजनक बातमी समोर आली आहे. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे. मोशी मधील तरुणाला या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं आहे.
उदय कुमार राय असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.
भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला उदय कुमारने फोन करून महेश लांडगे यांची सुपारी मला मिळालेली आहे. अशी माहिती फोनद्वारे दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली असून काही तासांत उदयकुमार रायला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, नेमकी धमकी देण्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत.