यवत : राष्ट्रीय मार्शल आर्ट स्पर्धा नुकत्याच प्रियदर्शनी इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स वेस्ट मुलुंड ( मुंबई ) येथील क्रीडा संकुलात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पूर्ण भारतातील पाच हजाराहून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये दौंड तालुक्यातील केडगाव, खुटबाव येथील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. हे सर्व विद्यार्थ्यांना ऑल मार्शल आर्ट एज्युकेशन फाउंडेशन अवधूत चिलवंत यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.
संस्थेतील विद्यार्थी शासकीय पातळीवर तसेच निमशासकीय पातळीवर तायक्वांदो कराटे, मार्शल आर्ट व इतर बाकीच्या खेळांमध्ये नेहमी प्राविण्य मिळवत असून महत्त्वाचे म्हणजे आजच्या युगामध्ये मुलींसाठी जे गरजेचे शिक्षण आहे. त्यामध्ये मानवी शरीरातील नाजूक भाग व डेट पॉइंट याचे प्रशिक्षणही या संस्थेमध्ये मुलींना दिले जाते. जेणेकरून संकटामध्ये स्वतःचे संरक्षण स्वतः कसे करतील याचा शारीरिक व मानसिक दृष्टया ही पूर्णपणे सराव करून घेतला जातो. स्पर्धेमध्ये दोन प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला गेला होता. यामध्ये काता व कुमिते हे दोन प्रकार होते.
स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे- केडगाव येथील यवन रोशन नायक ( काता – सुवर्णपदक, कुमिते -रौप्यपदक ), साईराम सुधीर पारखे ( काता -रौप्यपदक, कुमिते -कांस्यपदक ), सानिका सुधीर पारखे ( काता – रौप्यपदक, कुमिते- रौप्यपदक) व खुटबाव येथील स्नेहा संभाजी शेलार ( काता- रौप्यपदक, कुमिते-रौप्यपदक ), सायली दिपक होले ( काता-रौप्यपदक, कुमिते-रौप्यपदक), प्रणिती जकाप्पा वाघमारे (काता-रौप्यपदक, कुमिते-रौप्यपदक ), सृष्टी नवनाथ राऊत (काता-रौप्यपदक, कुमिते-कांस्यपदक )
या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शिक्षण भैरवनाथ विद्यालय खुटबाव तसेच मनोरा हायस्कूल केडगाव या ठिकाणी असून तेथील शिक्षक वर्गाकडून विद्यार्थ्यांना सन्मानित करून कौतुक करण्यात आले.