-संतोष पवार
पळसदेव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूरमधील शहा सांस्कृतिक भवन येथे पुणे जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत पळसदेव येथील श्री पळसनाथ विद्यालयाच्या एकूण 10 खेळाडूंनी सहभाग घेतला.
विद्यालयाच्या मानसी बनसुडे या ज्युदो खेळाडुने 14 वर्षे वयोगटात 44 किलो वजन गटातुन प्रथम क्रमांक मिळविला. तिची विभागीय शालेय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगिराज काळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव यांनी यशस्वी खेळाडूंचे आणि मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे, सुवर्णा नायकवडी, रामचंद्र वाघमोडे यांचे अभिनंदन केले आहे. जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेतील प्राविण्यधारक खेळाडू पुढीलप्रमाणे :
-प्रथम क्रमांक : मानसी बनसुडे – 14 वर्ष 44 किग्रॅ
-द्वितीय क्रमांक : कृष्णा यादव 14 वर्षे – 45 किग्रॅ
– प्रांजल काळे 19 वर्षे – 57 किग्रॅ
– कन्हैय्या इंजे 19 वर्षे – 45किग्रॅ
-तृतीय क्रमांक : कार्तिक जाधव 17 वर्षे – 45किग्रॅ
– कार्तिक काळे 19 वर्षे – 45किग्रॅ
– प्रणोती निंबाळकर 19 वर्षे -44 ग्रॅम